महाराष्ट्र शासन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
पालघर

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर आपले स्वागत आहे

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर आपले स्वागत आहे

महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाची स्थापना १९७१ मध्ये करण्यात आली आणि या संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

मा.डॉ. इंदु राणी जाखड़ (भा.प्र.से.)

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, पालघर

मा.श्री. सुहास व्हनमाने

जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर 

Hero image
Hero image

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर आपले स्वागत आहे

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर आपले स्वागत आहे

पालघर जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन १९७१ मध्ये झाली असून या क्रीडा संचालनालयामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे माध्यमातून जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन व राज्याच्या क्रीडा विकासाशी निगडित योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येते. राज्य शासनामार्फत क्रीडा विकासाकरीता राज्य व जिल्हा स्तरावर अनेक योजना / उपक्रम राबविण्यात येतात. या योजना / उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते.

क्रीडा ही मानवास प्राप्त झालेली निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येक मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रीडा क्षेत्राशी जुळलेला असतो. काही जण थेट स्वरूपात तर काही जण सहाय्य करण्याच्या भूमिकेतून या क्षेत्राशी निगडित झालेले असतात. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील अद्यावत माहिती प्रत्येकापर्यंत उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, विविध स्पर्धा, नामवंत खेळाडू, पुरस्कारार्थी, क्रीडा सुविधा इ. माहिती सर्वसामान्य लोकांपुढे सादर करतांना अत्यंत आनंद होतो आहे.

या माध्यमातून आपला जिल्हा क्रीडा क्षेत्रात काय करतो आहे याचे चित्र उभे करणे सुलभ होणार आहे. तसेच, आपल्या जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात असलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करता येणे शक्य होणार आहे. शासनामार्फत क्रीडा क्षेत्रासाठी असलेल्या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा देखील या माध्यमातून घेता येणे शक्य होणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय करीत असलेले काम व शासनाच्या विविध योजना तसेच पालघर जिल्ह्याची क्रीडा विषयक सद्यस्थिती सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Sports Complex

Palghar Gallery

  • आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    6/21/25

    आधुनिक काळातील धावपळीची जीवनशैली पाहता शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शनिवारी पालघर येथे केले. शनिवारी पालघर येथे योग दिन कार्यक्रम झाला. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, तहसीलदार सचिन भालेराव, विद्यार्थी उपस्थित होते.

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन

    6/23/25

    आगामी २०३२ च्या ऑलिंपिकमध्ये पालघर जिल्ह्यातील खेळाडूसुद्धा आपल्या देशाचे नेतृत्त्व करतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू स्नेहल राजपूत यांनी व्यक्त केला. ऑलिंपिक दिनानिमित्त सोमवारी (ता. २३) आयोजित स्पर्धेच्या वेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. २०३२ मधील ऑलिम्पिकसाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शुभेच्छा दिल्या. ऑलिंपिक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे बॅडमिंटन आणि धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.