महाराष्ट्र शासन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
पालघर

पालघर क्रीडा संकुल

पालघर क्रीडा संकुल

जिल्हा क्रीडा संकुल

संकुलाचे नाव

सद्यस्थिती

क्रीडा संकुलाचा पत्ता

जिल्हा क्रीडा संकुल, टेंभेाडे ता.जि. पालघर

क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल

१६ एकर, ६७/६८/२ टेंभेाडे ता.जि. पालघर

प्राप्त अनुदान

रुपये ३३७७.५३ लक्ष.

काम सुरु असलेल्या सुविधांचे नांवे

१) ८ लेन्सचा ४०० मी. चा सैंडाविच टाईप सिंथेटीक ट्रॅक २) हॉकी/ फुटबॉल मैदान ३) खुले प्रेक्षागृह ४) चेंजिंग रूम ५) इनडोअर हॉल (मल्टिपर्पज गेम हॉल) ६) विविध खेळांची क्रीडांगणे - व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, सिथेटीक मैदाने, कबड्डी, खो-खो ची २ मैदाने, लॉन टेनिस सिथेटीक मैदान व लोकप्रिय असलेल्या खेळांची अन्य मैदाने. ७) मल्टीजिम ८) वेटलिफ्टिंग

तालुका क्रीडा संकुल

अ. क्र.

संकुलाचे नाव

सद्यस्थिती

1

तालुका क्रीडा संकुल, वाडा

संकुलासाठी आराखडा अंतिम टप्प्यातील कार्यवाही सुरू असून १ कोटी निधी उपलब्ध झाला आहे.

2

तालुका क्रीडा संकुल, जव्हार

जागेच्या मागण्यांसाठी संबंधित तालुक्यातील आमदार महोदय यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

3

तालुका क्रीडा संकुल, विक्रमगड

जागेच्या मागण्यांसाठी संबंधित तालुक्यातील आमदार महोदय यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

4

तालुका क्रीडा संकुल, डहाणू

जागेच्या मागण्यांसाठी संबंधित तालुक्यातील आमदार महोदय यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

5

तालुका क्रीडा संकुल, तलासरी

जागेच्या मागण्यांसाठी संबंधित तालुक्यातील आमदार महोदय यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

6

तालुका क्रीडा संकुल, वसई

जागेच्या मागण्यांसाठी संबंधित तालुक्यातील आमदार महोदय यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

7

तालुका क्रीडा संकुल, मोखाडा

जागा वर्गीकरण पुढील कार्यवाहीकरिता मा. जिल्हाधिकारी, पालघर यांच्यामार्फत मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना पाठविण्यात आले आहे.

  • आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    6/21/25

    आधुनिक काळातील धावपळीची जीवनशैली पाहता शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शनिवारी पालघर येथे केले. शनिवारी पालघर येथे योग दिन कार्यक्रम झाला. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, तहसीलदार सचिन भालेराव, विद्यार्थी उपस्थित होते.

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन

    6/23/25

    आगामी २०३२ च्या ऑलिंपिकमध्ये पालघर जिल्ह्यातील खेळाडूसुद्धा आपल्या देशाचे नेतृत्त्व करतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू स्नेहल राजपूत यांनी व्यक्त केला. ऑलिंपिक दिनानिमित्त सोमवारी (ता. २३) आयोजित स्पर्धेच्या वेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. २०३२ मधील ऑलिम्पिकसाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शुभेच्छा दिल्या. ऑलिंपिक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे बॅडमिंटन आणि धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.